Sai Baba – Many questions

sai baba image

Narendra Modi has just come to Shirdi. His photograph with Sai Baba, idol published in newpapers & social media. At that time many questions came to mind, awkward awake. I was proud at one time for our Specialty culture, but I did not know what kind of footpath to use to understand this .

To be seen, Saibaba has been a fakir, all-life-long living in a mosque. Kafani, who showed signs of being a Muslim, continued up to the end. Although his disciples and followers tried to make him a pure Hindu by making all efforts, he could not even doubt the fact that he was a Muslim. For such a person, pro-Hindu prime minister has to come & pray. They got mostly Hindu devotees. They are transformed into incarnations. Shirdi became richest religious city in Maharashtra. What is This, the liberal liberalism down in the Indian man, the invention of Hindu philosophy that is standing on the feet of secularism, OR any more?

Another one, The jewelery worth crores of rupees is lifted on them, who is fakir in his hole life? Why do the people from all India struggle for their favors?

It is difficult to understand. But if you understand it, it can not be a good example for Hindus and Muslims in India to reduce their struggle.

In fact, the entire episode of Saibaba will go against both the Hindus and the Muslims. Islam is not acceptable to worship any idol. To make a dead person a idol and worship him as God, Hindu religion does not agree too. Shankaracharya expresses his displeasure on this. But Saibaba, who is not acceptable to both the religions, is very popular in millions & million people with both religions. The reason behind this is not understandable. Leave the person who does not believe in anybody, but any person of faith is sensitive to his own religion. Why do such religious minded people, despite the principles of religion, multiply millions of people come on the feet of Saibaba?

I do not have the same answer, but I am trying to find the answers. Please tell me if you find the answer

साईबाबा – अनेक प्रश्न

नरेंद्र मोदी नुकतेच शिर्डीला येऊन गेले. साईबाबांच्या मुर्तीच दर्शन घेतानाचा फोटोही झळकला. त्यावेळेस अनेक प्रश्न मनात आले, अनेक गोष्टींचं कुतुहल जाग झाल. आपल्या अजिबोगरीब संस्कृतीबद्दलचा एका परीने अभिमानही वाटला पण ही संस्कृती समजून घेण्यासाठी कोणती फुटपट्टी वापरावी हे मात्र कळेना.

म्हणजे बघाना, साईबाबा एक फकिर, सगळ्या आयुष्यभर राहिले एका मशिदीत. डोक्यावरील मुस्लीम असल्याची खुण दाखवणारी कफनी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यांच्या शिष्यांनी आणि अनुयांयांनी कितीही प्रयत्न करून त्यांना संपूर्ण हिंदू बनविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या मुस्लिम असण्याबद्दलचा संशय ते घालवू शकत नाही. अशा माणसासाठी हिंदुत्ववादी पंतप्रधानांना याव लागत. त्यांना बहुसंख्य हिंदू भक्त असतात. त्यांच अवतारात रुपांतर होत. त्यांच शिर्डी महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत देवस्थान ठरत या गोष्टी काय दर्शवतात. भारतीय माणसामध्ये निसर्गत:च असलेला उदारमतवाद, सर्वधर्मसमभावाच्या पायावर उभे असलेल्या हिंदू तत्वज्ञानाचा आविष्कार कि आणखी काही.

आणखी एक, फकिरीत आयुष्य काढलेल्या या माणसाच्या मुर्तींवर करोडोचे अलंकार कसे काय चढतात? देशभरातून त्यांच्या मुर्तीच्या दर्शनासाठी लोढेंच्या लोढें का धावतात?

हे समजून घेणे अवघड आहे. पण समजून घेतल तर हा भारतातील हिंदू मुस्लिम संघर्ष कमी करण्यासाठीचे एक उत्तम उदाहरण ठरू शकत.

खरतर साईबाबा हे एकुण प्रकरणच हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मतत्वांच्या विरोधात जाणार आहे. कोणाच्याही मुर्तीची पुजा होण हे इस्लामला मान्य नाही. एखाद्या मृत व्यक्तीची मुर्ती बनवून त्याची देवाप्रमाणे पुजा करणे हिंदू धर्मालाही मान्य नाही. शंकराचार्यांनी याबाबतची आपली नाराजी जाहिरपणे व्यक्त केलेली आहे. पण दोन्ही धर्मतत्वांना मान्य नसणारे साईबाबा मात्र दोन्ही धर्मांमध्ये भलतेच लोकप्रिय आहेत. यामागचे कारण समजता समजत नाही. ज्यांची कोणावरच श्रद्धा नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, पण कोणताही सश्रद्ध माणूस स्वत:च्या धर्माबद्दल संवेदनशील असतो. अशी धार्मिक वृत्तीची माणस त्या धर्माच्या तत्वांना न जुमानता लाखोच्या संख्येने साईबाबांच्या चरणी लोटांगण का घालतात?

माझ्याकडेही याच उत्तर नाहीय, पण मी उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करतोय. तुम्हाला उत्तर सापडल तर मला सांगा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.