अरेबियन नाईटस कथाकथन

अरेबियन नाईटसच्या कथा हा माझ्या आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे.  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयातील मुलांना यातील काही कथा सांगण्याची संधी मिळाली. सकाळच्या एनआयई च्या व्यासपीठाच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. त्याचीच ही सकाळ च्या पुणे जिल्हा आवृत्तीत आलेली बातमी.