मलाला – पार्ट 2

https://poll.fm/10543457 आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मलाला आज 22 वर्षाची आहे. या वयात तिच्या वाट्याला नोबेलसहीत 50 हून जास्त आंतरराष्ट्रीय अॅवॉर्ड आले आहेत. तिने स्थापन केलेल्या मलाला फंडाला दरवर्षी 40 लाख डॉलर्स ( रुपये नाही) इतकी मदत मिळते. ती आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलेब्रिटी आहे. पाकिस्तानमधील एक दुर्लक्षित प्रांतातल्या मुलीने ही गगनभरारी घेतली ती कशाच्या जोरावर? हेच… Continue reading मलाला – पार्ट 2

मलाला – पार्ट 1 (Malala)

कोरोनाच्या या संकटकाळीही शिक्षणाचा ध्यास न सोडणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनाठी मलालाची ही गोष्ट समर्पित

तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म?

रथाचे चाक काढताना कर्ण आणि त्याच्यावर अर्जून बाणांचा वर्षाव करताना तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म? हा प्रश्न श्रीकृष्णाने विचारला होता कर्णाला. वेळ होती महाभारत युद्धाची. कर्ण आणि अर्जून यांचे युद्ध सुरू होते. कर्णापुढे अर्जूनाचा निभाव लागेल असे वाटत नव्हते. त्यावेळी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले. काही केल्या ते बाहेर निघेना. ते बाहेर काढण्यासाठी… Continue reading तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म?

मानव अधिकार कार्यकर्त्यांची आई रोझा पार्क

रोझा पार्क मी एकट्याने काही करुन काय होणार आहे? हा आपला नेहमीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर रोझा पार्कच्या कहाणीत मिळू शकते. कोण ही रोझा पार्क? तिने अस काय केल? याची कहाणी खूप मोठी आणि दर्दभरी आहे. माणसांच्या माणुसपणाला कायमचा काळिमा फासणारी ही कहाणी सुरू होते आफ्रिकन माणसांना गुलाम बनवून आपल्या घरीदारी आयुष्यभरासाठी राबवून घेण्याच्या अमेरिकी… Continue reading मानव अधिकार कार्यकर्त्यांची आई रोझा पार्क

सखे आणि सोबती – जवाहरशेठ

पवारसाहेबांच्या पहिल्या निवडणूकीपासून त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे सहकारी जवाहरशेठ शहा यांचे हे व्यक्तिचित्र. पवारसाहेबांच्या पहिल्या निवडणूकीचे वातावरण टिपणारे. बारामतीचा इतिहासाचा ज्या ज्या वेळी आढावा घेतला जाईल, त्या त्या वेळी ६७ सालच्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, इतकी ही ऐतिहासिक निवडणूक होती. या निवडणुकीने बारामतीचे भविष्य बदललेच; पण त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशाच्या भविष्यालाही… Continue reading सखे आणि सोबती – जवाहरशेठ

पिपांत मेले ओल्या उंदिर…

मराठीतील एक प्रसिद्ध कविता. कवीचे नाव ओठावर आहे, पण आत्ता आठवत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कॉमेंटमध्ये नक्की टाका.

गावगोष्टी

पिपांत मेले ओल्या उंदिर;

माना पडल्या, मुरगळल्याविण;

ओठांवरती ओठ मिळाले;

माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,

पिपांत मेले उचकी देउन;

दिवस सांडला घाऱ्या डोळीं

गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;

मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे

काचेचे पण;

मधाळ पोळे;

ओठांवरती जमले तेंही

बेकलाइटी, बेकलाइटी!

ओठांवरती ओठ लागले;

पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

ह्या कवितेचा मला समजलेला अर्थ देतेय. इथे उंदीर हे एक रूपक आहे. जगण्याची धडपड करता करता रंजलेले गांजलेले लोक. शहरातील मजूरवर्ग. झोपडपट्टीच्या पिंपात जगण्यासाठीचा लढा प्रत्येक दिवशी देणारे लोक. ज्यांच्या ना जन्माचा हिशोब आहे ना मरणाची दाद आहे. ज्यांना आयुष्यातील चांगली हवा, शुद्ध पाणी, पोटभर जेवण, शिक्षण अशा मूलभूत गरजाही नाकारल्या गेल्या आहेत. ज्यांच्या राष्ट्रीयत्वाचा काही पुरावा नाही. या राष्ट्राचे नागरिक असूनही ज्यांना त्याचा काही उपयोग झाला नाही,अशा लोकांची फिर्याद कवी मांडतो आहे.

Rain, chill or heatwave, homeless poor have few places to turn to ...

जगण्याची सक्ती तर प्रत्येकाला आहे, कितीही वाईट परिस्थिती असली तरी मृत्यूला जवळ घेणे सर्वाना जमते असे नाही. त्यांनी ते करूही नये…

View original post 161 more words

महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूत्रधार

मलिक अंबर भाग 2 30 वर्षाच्या मलिक अंबरच्या या राजकीय कारकिर्दीत निजामशाहीची सगळी सूत्रे मलिक अंबरने आपल्या हातात राखण्याचा प्रयत्न केला. त्या काळची निजामशाही म्हणजे विदर्भ वगळता जवळपास सगळा महाराष्ट्राचा परिसर होय. ही सुत्रे हातात ठेवण्यासाठी त्याने सगळ्या भल्या बुऱ्या मार्गांचा वापर केला. आपला जावई म्हणजेच निजामशहा आपले ऐकेनासा झाला आहे असे ज्यावेळी त्याच्या लक्षात… Continue reading महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूत्रधार

आफ्रिकन गुलाम ते औरंगाबादचा निर्माता

आदर्श व्यक्तिमत्वे - 2. मलिक अंबर आफ्रिकन गुलाम ते महाराष्ट्राचा राज्यकर्ता असा थरारक जीवनप्रवास असणारा माणूस म्हणजे मलिक अंबर याचा जन्म आफ्रिकेतील इथिओपियाचा. चापू हे मुळचे नाव. आफ्रिकन काळ्या लोकांना पकडून गुलाम म्हणून जगभर विकण्याची त्या काळात स्पर्धाच सुरु होती. चापूचे घर इतके गरीब की त्याच्या आईवडिलांनीच त्याला वयाच्या आठ, नऊ वर्षी मक्केच्या अरब व्यापाऱ्यांना… Continue reading आफ्रिकन गुलाम ते औरंगाबादचा निर्माता

आदर्श व्यक्तिमत्वे 1.अतातुर्क केमाल पाशा

मला आदर्श वाटणाऱ्या काही ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबाबतची मालिका - त्यातील पहिले तुर्कस्थानचे राष्ट्रपिता अतातुर्क केमाल पाशा