प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत

आपल्या जवळच्या नात्यावरचा आणि त्यातल्या प्रेमावरचा हा लेख. अनेक दिवस मनात होत ते आज कागदावर उतरवल. या नात्यांचे अनेक प्रकार मला जसे दिसले तसे तुमच्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

व्हेंटिलेटर्स आणि रक्तदान

रगोमें दौडते फिरनेके हम नही कायल आँखोसे न टपका तो खून क्या है ( नुसते धमन्यातून फिरत राहण्याची आम्हाला हौस नाहीये, जर एखाद्याचे दु:ख पाहून डोळ्यातून अश्रू आले नाहीत तर या रक्ताचा उपयोग काय? ) -- गालिब--- पुढच्या काही दिवसानंतर या दोन गोष्टींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. यासाठी आपण काय करु शकतो. कोरोनाचा संसर्ग… Continue reading व्हेंटिलेटर्स आणि रक्तदान

कोरोना आणि नारायणास्र

तुम्ही म्हणाल काय संबंध? आणि हे नारायणास्र कुठल काढल. तर हे नारायणास्र महाभारतातल. गुरु द्रोणाचार्य यांचा वध झाल्यावर त्यांचा मुलगा अश्वथामा याने हे नारायणास्र पांडवांच्या सैन्यावर सोडल. पांडवांचा प्रमुख योद्धा अर्जुनाने वेगवेगळ्या अस्रांव्दारे नारायणास्राचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण जेवढा प्रतिकार केला तेवढे या नारायणास्राची ताकद वाढत गेली. हतबल अर्जुनाने श्रीकष्णाकडे धाव घेतली. श्रीकृष्णाने अर्जुनाला… Continue reading कोरोना आणि नारायणास्र

साद रोहिले किनाऱ्याची

पर्यटकांसाठी कोकण हा एक अद्दभूत असा खजिना आहे. यातून असंख्य जगाच्या नजरेआड राहिलेल्या जागा सापडतात. त्यातीलच एक ठिकाण येथे दिलेले आहे. अवश्य भेट द्या.

Darya Firasti

अगदी अनपेक्षितपणे, अनपेक्षित ठिकाणी एखादा कायमचा लक्षात राहील असा अनुभव मिळणं ही भ्रमंतीची मजा आहे. असंच एक अनपेक्षितपणे मला गवसलेलं कोकणातील रम्य ठिकाण म्हणजे रोहिले. जयगडहून गुहागरकडे जाताना तवसाळला फेरीने शास्त्री नदी ओलांडली की सागरी महामार्गाने वेळणेश्वर, हेदवी, पालशेत, असगोळी असे टप्पे पार करत आपण जातो. तवसाळच्या किनाऱ्यानंतर एक छोटीशी नदी येते ती ओलांडली की तांबूस वाळू असलेला छोटासा रोहिले किनारा लागतो. इथं नोव्हेंबरधील एका निवांत सकाळी मी अर्धा तास जो निसर्गानुभव घेतला तो अगदी अविस्मरणीय आहे. तवसाळ गावचा चढ ओलांडून पठारावर पोहोचलं की पश्चिमेकडे समुद्र आणि त्याला जाऊन भिडलेली छोटीशी खाडी दिसते. आंब्याची झाडे आणि नारळ पोफळीच्या गर्दीतून आपल्याला ही रोहिले किनाऱ्याची पहिली झलक दिसते. कोकणात प्रवास करत असताना जाणवणारी विशेष गोष्ट म्हणजे दोन अगदी बाजूबाजूला असलेल्या गावांच्या दरम्यान एखादी टेकडी किंवा खाडी असते आणि नकाशात जरी ही गावे शेजारी दिसली तरी २-३ किमी अंतराचा छोटासा नागमोडी घाट चढून आपण पलीकडे पोहोचतो. तवसाळचा डोंगर उतरून आपण रोहिले गावात शिरण्यापूर्वी…

View original post 309 more words

सखे आणि सोबती -खुशालभाऊ छाजेड

शरद पवार यांचे बारामतीतील आणखी एक सहकारी कै. खुशालभाऊ छाजेड यांचे व्यक्तिचित्र खुशालशेठ छाजेड यांच्या दुकानात शरद पवारांची बैठक विद्या प्रतिष्ठानला मिळालेल्या देणग्यांबाबत विधानसभेत गरमागरम चर्चा सुरू होती. पवारसाहेब उत्तर द्यायला उभे राहिले. विरोधकांचे आरोप खोडताना ते म्हणाले, "विद्या प्रतिष्ठानचा खजिनदार तुमचाच आहे." काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक संस्था आणि त्याचे खजिनदारपद विरोधी विचारधारेच्या माणसाकडे. हे… Continue reading सखे आणि सोबती -खुशालभाऊ छाजेड

परिक्रमावासियों से नर्मदा मैया को प्लास्टिक कचरा मुक्त बनाने की अपील 

नर्मदा परिक्रमा करनेवालों ने पर्यावरण का ध्यान रखना जरुरी है, ये अपने अनुभवसे बताने वाला ये पोस्ट

SANDRP

Guest Blog by Jubin Mehta

मैंने और मेरे साथी ने 25 नवंबर 2019 से 25 फरवरी 2020 का समय नर्मदा परिक्रमा के दौरान नदी किनारे यात्रा करते हुए व्यतीत किया। करीब 90 दिनों तक चली इस परिक्रमा में हमने कुछ 2500 किमी की पदयात्रा और शेष लगभग 1000 किमी का सफर गाड़ी से किया। बड़ा ही सुन्दर अनुभव रहा- किनारे पर बसे हुए लोगों का भाव, मंदिर और आश्रमों की सेवा और नर्मदा मैया के चमत्कार ने ह्रदय को निर्मल कर दिया और मन को भी एक अद्भुत सी शान्ति से मिली।   

View original post 579 more words

सखे आणि सोबती – बी. जी. ऊर्फ बाळासाहेब काकडे

बी.जी. उर्फ बाळासाहेब काकडे पवारसाहेबांची बारामती तालुक्यातील राजकीय कारकीर्द सुरू झाली ती ६२ सालापासून. त्यावेळेस बारामती तालुक्यातील राजकीय परिस्थिती मोठ्या गोंधळाची होती. तालुक्याच्या आमदार मालतीताई शिरोळे या तालुक्याबाहेरच्या. खासदारही बाहेरचे. तालुक्यात अनेक गटतट; परंतु राजकारण तसेच सहकारावर निंबूत गावच्या काकडे घराण्याचे वर्चस्व. ते ठरवतील तो आमदार, कारखान्याचा पदाधिकारी, सहकारी सोसायटीचा चेअरमन किंवा सचिव होत असे.… Continue reading सखे आणि सोबती – बी. जी. ऊर्फ बाळासाहेब काकडे

शिवाजीराव खटकाळे

शरद पवार यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना शिवाजीराव खटकाळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विश्वात १९८० ते ९० चा काळ संप, ताळेबंदी असा औद्योगिक अशांततेचा  होता. कामगार युनियन अत्यंत आक्रमक होत्या. मुंबईमध्ये कापड गिरण्यांमध्ये मालक व कामगारांचा मोठा संघर्ष सुरू होता, ज्याची परिणती मुंबईच्या कापड गिरण्या बंद होण्यात झाली. याची झळ बारामतीच्या परिसरातील वालचंदनगर इंडस्ट्रीजलासुद्धा लागली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वालचंद… Continue reading शिवाजीराव खटकाळे