शिक्षणासाठी अमेरिकेत असलेल्या शिवम गायकवाड यांनी मांडलेले आजचे अमेरिकेचे वास्तव

Written April 12th, 2020
मी अमेरिकेत एका विद्यापीठात शिकतोय. आमची चालू सेमिस्टर जानेवारी महिन्यात सुरु झाली. तेव्हा ‘कोरोना व्हायरस’ हा फक्त चीन मध्ये पसरल्याची बातमी कानावर येत होती आणि हा विषय अमेरिकेत एवढा गंभीर नव्हता. माझ्या विद्यापीठाचे कामकाज तेव्हा सुरळीत चालू होते. अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीच्या अखेरीस वॉशिंग्टन या राज्यात सापडला. हा रुग्ण काही दिवसांपूर्वीच चीन मध्ये प्रवास करून अमेरिकेत आला होता. या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपले सुरवातीचे विधान मांडले, “आपल्याकडे हा व्हायरस पूर्णपणे ताब्यात आहे”.
अमेरिका हा जगाचा ‘मेल्टिंग पॉट’ असल्याने इथे जगभरातून लोकांचे येण्याचे प्रमाण खूप आहे. याच कारणामुळे अनेक मोठ्या इस्पितळांमध्ये खास कोरोनाची पूर्वतयारी म्हणून १०-२० वेगळ्या खोल्यांची निर्मिती करण्यात आली. कालांतराने फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत संसर्ग होत हा व्हायरस संपूर्ण अमेरिकेत पसरण्यास सुरूवात झाली. न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन यांसारख्या दाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये तो खूप वेगाने पसरला. याच कालावधीत गर्दी टाळण्याचे सगळे नियम आणि सामाजिक दुरस्थता अमेरिकेत लागू करण्यात आले…
View original post 934 more words