
तुम्ही काय करू शकता?
याआधीच्या पोस्टनूसार आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारी महाराष्ट्रव्यापी संघटना उभारण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याच्या प्रमुख उद्देशापैकी पहिले उदिष्ट आहे, ते म्हणजे गरीब आर्थिक स्थितीतील रुग्णांना आवश्यक मदत करणे.दुसरे उदिष्ट महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे.
ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यसाठी जी महत्वाची साधने आम्ही उपयोगात आणणार आहोत. त्यापैकी एक www.aarogyadaan.org ही वेबसाईट. आणि दुसरे साधन म्हणजे रायगड ते शिवनेरी अशी एक वर्षाची जनारोग्य महापरिक्रमा.
यासाठी तुम्ही काय करू शकता?
- तुम्ही बॅकर्स म्हणून नोंदणी करू शकता.
- तुम्ही व्हॉलियंटर ( स्वयंसेवक) म्हणून नोंदणी करू शकता तुम्ही www.aarogyadaan.org या वेबसाईटवर जाऊन व्हॉलियंटर म्हणून नोंदणी करू शकता. व्हॉलियंटर किंवा स्वयंसेवक म्हणून तुम्ही तुमच्या परिसरातील डॉक्टर किंवा हॉस्पीटल्स यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांच्याकडील ज्या पेशंटला आर्थिक मदतीची गरज असेल त्याचे वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करू शकता. आपल्या परिसरातील सधन व्यक्तींकडे जाऊन त्यांना बॅकर्स म्हणून नोंदणी करण्याची विनंती करू शकता. याखेरीज आपल्या ओळखीच्या व्यक्तींना या वेबसाईटची माहीती देऊन त्याव्दारे रुग्ण आणि दाते यांना या वेबसाईटवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करू शकता. तुमच्या या प्रयत्नांमुळे अनेक गरीब आर्थिक स्थितीतील कुटुंबाना त्यांच्या अडचणीच्या काळात मदत होऊ शकते.
याखेरीजही तुम्ही अनेक मार्गाने या चांगल्या कामात सहभागी होऊ शकता, त्याची माहिती यापुढील पोस्टमध्ये.
आरोग्यदानाच्या या चळवळीत आपण सहभागी होऊ इच्छित असाल तर आपले नाव, पत्ता, व्हाटसअप नंबर आणि ईमेल आयडी 9881098138 या व्हाटसअप मोबाईल नंबरवर पाठवावे ही विनंती.