
तुम्ही काय करू शकता?
याआधीच्या पोस्टनूसार आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारी महाराष्ट्रव्यापी संघटना उभारण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याच्या प्रमुख उद्देशापैकी पहिले उदिष्ट आहे, ते म्हणजे गरीब आर्थिक स्थितीतील रुग्णांना आवश्यक मदत करणे.दुसरे उदिष्ट महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे.
ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यसाठी जी महत्वाची साधने आम्ही उपयोगात आणणार आहोत. त्यापैकी एक www.aarogyadaan.org ही वेबसाईट. आणि दुसरे साधन म्हणजे रायगड ते शिवनेरी अशी एक वर्षाची जनारोग्य महापरिक्रमा.
यासाठी तुम्ही काय करू शकता?
- तुम्ही बॅकर्स म्हणून नोंदणी करू शकता. तुम्ही www.aarogyadaan.org या वेबसाईटवर जाऊन बॅकर्स ( मराठीत पाठीराखे) म्हणून नोंदणी करता त्यावेळी तुम्ही मदत करण्याची इच्छा व्यक्त करीत असता. यासाठी फॉर्ममध्ये ही मदत आर्थिक स्वरूपात, वस्तू रुपात कि सेवा रुपाने करणार याची नोंद करता. कोणत्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील पेशंटला मदत करणार, किंवा कोणत्या आजारासाठी मदत करणार यासाठीचे तुमचे प्रेफरेंन्सेस देता. ज्यावेळी तुमच्या प्रेफरेंन्सेसशी जुळणारा एखादा पेशंट मदतीसाठी या वेबसाईटवर अर्ज करतो. त्यावेळी तुम्हाला एसएमएमव्दारे कळविले जाते. त्यानंतर तुम्ही वेबसाईटवर जाऊन या पेशंटची माहिती घेऊ शकता. या पेशंटला मदत करायची की नाही हे पुर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. याबाबत कोणतीही सक्ती नाही. ज्या ज्या वेळेस तुमच्या प्रेपरेंन्सेसशी जुळणारा पेशंट अर्ज करेल त्यावेळी तुम्हाला एसएमएस येईल. ज्यावेळी तुम्हाला शक्य आहे, त्यावेळी तुम्ही त्याला मदत करण्याची निर्णय घेऊ शकता. मदत किती रुपयाची करायची, कशी करायची हा सर्वस्वी तुमच्या सद्सदविवेकबुद्धीवर आधारीत असा निर्णय आहे. परंतू तुमची अगदी छोटीशीही मदत एका कुटुंबाला मोठा आधार देऊ शकते.
याखेरीजही तुम्ही अनेक मार्गाने या चांगल्या कामात सहभागी होऊ शकता, त्याची माहिती यापुढील पोस्टमध्ये.
आरोग्यदानाच्या या चळवळीत आपण सहभागी होऊ इच्छित असाल तर आपले नाव, पत्ता, व्हाटसअप नंबर आणि ईमेल आयडी 9881098138 या व्हाटसअप मोबाईल नंबरवर पाठवावे ही विनंती.