झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 5

याआधीच्या पोस्टनूसार आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारी महाराष्ट्रव्यापी संघटना उभारण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याच्या प्रमुख उद्देशापैकी पहिले उदिष्ट आहे, ते म्हणजे गरीब आर्थिक स्थितीतील रुग्णांना आवश्यक मदत करणे.दुसरे उदिष्ट महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे.

ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यसाठी जी महत्वाची साधने आम्ही उपयोगात आणणार आहोत. त्यापैकी एक www.aarogyadaan.org ही वेबसाईट. या वेबसाईट योग्य पद्धतीने काम करायला लागली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली तर कमी वेळात आणि श्रमात आपण वरील दोन्ही उद्दिष्टे साध्य करू शकतो. परंतू केवळ सोशल मिडीयावर अवलंबून राहून ही वेबसाईट लोकांपर्यंत पोचणार नाही. तर त्यासाठी प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोचले पाहिजे.

हाच विचार पुढे ठेऊन आम्ही जनारोग्य महापरिक्रमा हा उपक्रम हाती घेत आहोत. ही महाराष्ट्राची रायगड ते शिवनेरी अशी एक वर्ष चालणारी पायी परिक्रमा असेल. या प्रवासात 25 जिल्हे आणि 200 हून जास्त तालुक्यांमध्ये आपण पोहचू. या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी, डॉक्टरांशी, मदत देऊ इच्छिणाऱ्यांशी संपर्क साधू. ही परिक्रमा आणि त्याला सोशल मिडीयाची जोड या दोन्हीच्या समन्वयाने ही वेबसाईट योग्य व्यक्तींपर्यंत पोहविण्यात आपल्याला यश मिळू शकेल.

ही परिक्रमा आपण 17 ऑक्टोबर म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून रायगड किल्ल्यापासून सुरू करीत आहोत. 4072 किलोमीटरची 342 दिवस चालणारी, 257 गाव आणि शहरामध्ये मुक्काम असणारी ही परिक्रमा आहे. या परिक्रमेबाबत अधिक माहिती यापुढील पोस्टमधून आपल्याला मिळेलच.

आरोग्यदानाच्या या चळवळीत आपण सहभागी होऊ इच्छित असाल तर आपले नाव, पत्ता, व्हाटसअप नंबर आणि ईमेल आयडी 9881098138 या व्हाटसअप मोबाईल नंबरवर पाठवावे ही विनंती.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.