झुंज आरोग्यपूर्ण महाराष्ट्रासाठी – 3

याआधीच्या पोस्टनूसार आरोग्याच्या प्रश्नावर काम करणारी महाराष्ट्रव्यापी संघटना उभारण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. त्याच्या प्रमुख उद्देशापैकी पहिले उदिष्ट आहे, ते म्हणजे गरीब आर्थिक स्थितीतील रुग्णांना आवश्यक मदत करणे

दुसरे उदिष्ट महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था व व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणणे. सध्या राज्यात स्थानिक स्तरावर असंख्य लोक आपपल्या परीने काम करीत आहे. कोणी रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण देत आहेत. कोणी अशा कुटुंबाना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत. कोणी वस्तुरूपात मदत करीत आहेत. परंतू या सर्वांमध्ये परस्परसंवादाचा अभाव आहे. त्यामुळे हे सगळे काम विस्कळीत स्वरूपाने सुरू आहे.

तसेही या क्षेत्रात काम करणाऱ्या अशा संस्था आणि व्यक्तींची कमरता आहे. त्यामुळे यासाठी तालुका व जिल्हास्तरावर नव्याने कार्यकर्ते तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे याचीही गरज आहे.

हा एका ध्येयाने काम करणारा वर्गच आपल्याला आरोग्यपूर्ण महाराष्ट्राकडे घेऊन जाऊ शकतो.

Www.aarogyadaan.org या नावाने आम्ही वेबसाईट सुरू केली आहे. ही प्राथमिक स्वरुपातील वेबसाईट असून त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संसथा आणि व्यक्तींना एकत्रित करण्याचे उद्दिष्ट आहे.

आरोग्यदानाच्या या चळवळीत आपण सहभागी होऊ इच्छित असाल तर आपले नाव, पत्ता, व्हाटसअप नंबर आणि ईमेल आयडी 9881098138 या व्हाटसअप मोबाईल नंबरवर पाठवावे ही विनंती.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.