पर्यटकांसाठी कोकण हा एक अद्दभूत असा खजिना आहे. यातून असंख्य जगाच्या नजरेआड राहिलेल्या जागा सापडतात. त्यातीलच एक ठिकाण येथे दिलेले आहे. अवश्य भेट द्या.

अगदी अनपेक्षितपणे, अनपेक्षित ठिकाणी एखादा कायमचा लक्षात राहील असा अनुभव मिळणं ही भ्रमंतीची मजा आहे. असंच एक अनपेक्षितपणे मला गवसलेलं कोकणातील रम्य ठिकाण म्हणजे रोहिले. जयगडहून गुहागरकडे जाताना तवसाळला फेरीने शास्त्री नदी ओलांडली की सागरी महामार्गाने वेळणेश्वर, हेदवी, पालशेत, असगोळी असे टप्पे पार करत आपण जातो. तवसाळच्या किनाऱ्यानंतर एक छोटीशी नदी येते ती ओलांडली की तांबूस वाळू असलेला छोटासा रोहिले किनारा लागतो. इथं नोव्हेंबरधील एका निवांत सकाळी मी अर्धा तास जो निसर्गानुभव घेतला तो अगदी अविस्मरणीय आहे. तवसाळ गावचा चढ ओलांडून पठारावर पोहोचलं की पश्चिमेकडे समुद्र आणि त्याला जाऊन भिडलेली छोटीशी खाडी दिसते. आंब्याची झाडे आणि नारळ पोफळीच्या गर्दीतून आपल्याला ही रोहिले किनाऱ्याची पहिली झलक दिसते. कोकणात प्रवास करत असताना जाणवणारी विशेष गोष्ट म्हणजे दोन अगदी बाजूबाजूला असलेल्या गावांच्या दरम्यान एखादी टेकडी किंवा खाडी असते आणि नकाशात जरी ही गावे शेजारी दिसली तरी २-३ किमी अंतराचा छोटासा नागमोडी घाट चढून आपण पलीकडे पोहोचतो. तवसाळचा डोंगर उतरून आपण रोहिले गावात शिरण्यापूर्वी…
View original post 309 more words