प्रवास


आपुलाच संवाद आपुल्याशी करणारी ही कविता

Pratibimb

जन्मल्यापासून , किंबहुना त्याही आधीपासून
आपल्याही नकळत
आपला एक प्रवास सुरू असतो…
स्वशोधाच्या वाटेवरचा….!

स्वतःच्या अन् या काळाच्या सोबतीने
चालू असलेला हा प्रवास ….!
कधी स्वतःतच खोल डोकावू पाहणारा ,
या आत-बाहेर समीकरणाला छेद देऊन
सारेच एक करू पाहणारा ….हा अथांग प्रवास !

या अनंत काळाच्या असीम वाटेवरचे
केवळ एक प्रवासी आहोत आपण सारेच !
अनादिअनंत काळ चालत आलेले
आणि फिरून परत त्याच जागी येऊन थांबणारे ….!

कधी गूढ तिमिरातून ,
कधी प्रकाशाच्या वलयातून नेणारा हा प्रवास ,
जणू कोणीतरी आधीच निश्चित केलेला …!
आपल्याही नकळत , ‘तो’ आपले बोट धरून
अलगद त्या वाटांवरून आपल्याला नेत असतो ….
आपण फक्त त्या वाटेवर चालायचे ,
येणाऱ्या प्रत्येक क्षणी शिकायचे ,
कसोटीवर स्वतःला आजमवायचे ,
पारखून घ्यायचे , स्वतःलाच पैलू पाडायचे
आणि असे समृद्ध जीवन जगायचे !

पण मग वाटते ,
या साऱ्याचा शेवट ….?
तो असेल तर आहे कुठे आणि कसा ?
पण या अनाकलनीय वाटेवरील ते गूढही
अजून अनाकलनीयच आहे…

View original post 46 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.