शाकाहार आणि मांसाहाराच्या चर्चा आजही रंगत असताना 100 वर्षापूर्वी एका ब्राम्हणाने काढलेल्या मासांहारी पदार्थांबाबत माहिती देणारा हा मनोरंजक लेख.
आजकाल दसरा आला की पेपरात चांदीच्या वाटीत श्रीखंड त्यावर केशराच्या चार काड्या आणि काजूची पखरण असे फोटो येतात. हे फोटो बघून अशी आपली अशी समजूत होती की दसऱ्याला श्रीखंड खाणे हा जणू आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. पण खरं सांगायचं तर ही सगळी सध्या नव्याने निर्माण झालेल्या मुठभर अभिजनवर्गाची संस्कृती आहे. महाराष्ट्र कधीच दुधातुपानं भरून वहात नव्हता त्यामुळं दसऱ्याला घरोघरी श्रीखंड वगैरे काही केलं जायचं नाही. पुरणाची पोळी, काळा मसाला घालून केलेली कटाची झणझणीत आमटी आणि लहान मुलांसाठी गुळवणी असा साधा बेत असायचा. हे सुद्धा काही सार्वत्रिक नव्हतं अनेक गावात दसऱ्याला शिकार करायची प्रथा होती ती शिकार होऊन घरोघर तिचा ‘रवा’ पोचता झाल्याशिवाय चुलीवर भांडेही चढत नसे. याशिवाय खंडेनवमीला हत्यारं पुजल्यावरही त्याना बळी देण्याची प्रथा होती आणि आहे.
मांसभक्षण करणे हे काय आपल्या संस्कृतीला नवीन नाही आणि त्याचे वावडेही नाही. हां पण कुणी काय खावं याबद्दल आपल्याकडं एकेकाळी नीतिनियम होते, काही लोकांना कानांवर मांस वगैरे शब्द पडल्यानेही हातून पाप घडल्याची भावना…
View original post 1,715 more words