हम देखेंगे

फैज अहमद फैज

फैज अहमद फैज यांची ही रचना. कानपूरच्या आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी ही रचना सीएए कायद्याच्या विरोधात होत असलेल्या प्रदर्शनामध्ये गायली. त्यानंतर काहींनी या गाण्याला हिंदूविरोधी ठरवून त्याबद्दल तक्रार केली. सध्या या तक्रारीचा अभ्यास करण्यासाठी कमिटी बसलेली आहे.

प्रत्यक्षात फैज यांनी ही कविता लिहली पाकीस्तानचे हुकुमशहा झिया यांच्या दडपशाही आणि धर्मांध धोरणांविरोधात. झियांनी त्यांना तुरुंगात टाकले आणि ही कविता कुठेही गायली जाऊ नये यासाठी निर्बंध आणले. पाकिस्तानमधील प्रख्यात गायिका इक्बाल बानो यांनी निर्बंध असतानाही लाहोर स्टेडियमवर हजारो लोकांसमोर या कवितेचे गायन केले होते. झियांनी साडीवरही बंदी घातली होती आणी काळया रंगावरही. इक्बाल बानो ही कविता गाण्यासाठी काळ्या रंगाची साडी घालून आल्या होत्या.

त्यामुळे या कवितेच्या रचनेत आणि गायनातच दडपशाहीविरुद्ध लढण्याची उर्मी आहे, अशी ही कविता.

सर्वसामान्य माणसांचा सत्ताधिशांविरुद्धच्या आवाजाला शब्द देणारी ही रचना. कधीतरी सामान्य माणूस सत्तेवर बसण्याचे दिवस येतील ही आशा बाळगून लढा देत राहणाऱ्यांची ही रचना. वास्तव हे आहे की अस कधी घडले नाही आणि घडणारही नाही. पण म्हणून लढाई थांबत नाही. रक्तामासांनी भरलेल्या मैदानातून नवेनवे गुलाब फुलतच राहतात. पुन्हा पुन्हा माणस उभी राहतात आणि म्हणतात — हम देखेंगे.

हम देखेंगे

लाज़िम है कि हम भी देखेंगे

हम देखेंगे

वो दिन कि जिस का वादा है

जो लोह-ए-अज़ल में लिखा है

हम देखेंगे

जब ज़ुल्म ओ सितम कि कोह-ए-गराँ

रुई की तरह उड़ जायेंगे

हम महकुमो के पांव तले

ये धरती धड़ धड़ धड्केगी

और ओह्ल-ए-हाकम के सर ऊपर

जब बिजली कड़ कड़ कड़केगी

हम देखेंगे

जब अर्ज़-ए-खुदा के काबे से

सब बुत उठवाए जायेंगे

हम ओहल-ए-सफ़ा मरदूद-ए-हरम

मसनद पे बिठाये जायेंगे

सब ताज उछाले जायेंगे

सब तख्त गिराए जायेंगे

हम देखेंगे

बस नाम रहेगा अल्ला का

जो गायब भी है हाज़िर भी

जो मंजर भी है नाज़िर भी

उठेगा अन-अल-हक का नारा

जो मैं भी हूँ और तुम भी हो

और राज करेगी खलक-ए-खुदा

जो मैं भी हूँ और तुम भी हो

हम देखेंगे

लाजिम है कि हम भी देखेंगे

हम देखेंगे

—————————————————————–

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.