नळीचे दिवस!

Sunny Special

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नळीचे दिवस!

सुनील शेडगे । नागठाणे ता. सातारा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एरव्ही नदीकडं कधी जाणं घडत नाही. नदीची सहजी आठवणही होत नाही. जगण्याचा वेगच इतका अफाट अन् अचाट, की त्याच्यापुढं आता जणू कशाचाच टिकाव लागत नाही.

सुट्टीत काल संध्याकाळी आपसूकच पाय नदीकडं वळले. पोरवयातल्या कितीतरी आठवणी तिच्यापाशी रेंगाळेल्या होत्या. उरमोडी ही आमची नदीमाय. नदीला माय संबोधणं यातच अापलं तिच्याशी असलेलं नातं कळतं. त्यासाठी आणखी शब्द हवेतच कशाला?

हायवेवरुन पश्चिमेकडं सरळ तोंड केलं, की पुढची वाट नदीकडं जाते.
नदी ओलांडली, की मग नळी.
खरं तर नळी म्हटलं तर फारसा अर्थबोधही होणार नाही. मात्र नळी शब्द ऐकिवात नाही, नळी माहित नाही असा माणूस गावात विरळाच.
नळी म्हणजे झऱ्याचं वाहतं पाणी घेऊन जाणारा मार्ग. कदाचित कुणी म्हणेल हा काय सांगण्याचा, लिहिण्याचा विषय?

अर्थात नळीचं माहात्म्य मोठं.
नळीचा आधारही मोठा. म्हणजे त्याकाळी उन्हाळ्यात नदी आटेल, मात्र नळी अखंड वाहातच राहणार.
ही नळी म्हणजे तनामनाला थंडाई देणारी आमची जिव्हाळ्याची जागा. अंगाची लाही होत असताना जावं अन्…

View original post 170 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.