नवागावची ज्यू दफनभूमी

भारताने जगाला नेहमीच आकर्षित केले आहे. वेगवेगळ्या कारणांंनी जगाभरातून अगदी प्राचीन काळापासून लोक भारतात येत असत. कोकणात आलेले ज्यू हे याचे एक ठळक उदाहरण.

Darya Firasti

दफनभूमीतील स्मृती स्तंभ

भारतातील ज्यू धर्मियांपैकी बेने इस्राएल समाज हा सर्वात जुन्या समाजांपैकी एक मानला जातो. उत्तर कोकणात मुख्यत्वेकरून या समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. मुंबई, ठाणे, पेण, पनवेल, किहीम – नवागाव, रेवदंडा, बोर्ली अशा अनेक ठिकाणी त्यांची प्रार्थनास्थळे आणि दफनभूमी आहेत. मराठीशी एकरूप झालेल्या या समाजातील लोकांना इस्राएलची निर्मिती झाली तेव्हा आपला देश मिळाला आणि बहुतेक मराठी ज्यू तिथं जाऊन स्थायिक झाले. परंतु आजही दख्खनेतील आपल्या इतिहासाबद्दल त्यांना आपुलकी आहे.

बेने इस्राएल समाजात प्रचलित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे सुमारे २२०० वर्षांपूर्वी पॅलेस्टाईन मध्ये सेल्युसिड घराण्याचे अत्याचार सहन न झाल्याने जहाजात बसून काही कुटुंबे भारतात आली. किनाऱ्याजवळ झालेल्या वादळ आणि अपघातात त्यापैकी अनेक जण मारले गेले आणि ७ परिवार कोकण किनाऱ्यावर उतरले. आणि स्थानिक संस्कृतीशी समरस होऊन जगू लागले. बेने इस्राएल समाजाचे लोक तब्बल २२०० वर्षांपूर्वी भारतात आले याचा लेखी पुरावा सापडलेला नाही. पण हा दावा खोटा ठरवणारा पुरावाही नाही. मिसार-बिन-मुहलहिल या १० व्या शतकात आलेल्या अरब व्यापाऱ्याच्या नोंदीप्रमाणे कोकणात तेव्हाही ज्यू धर्मीय…

View original post 257 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.