‘अशा पटवा मुली!’पारशी युवकांना प्रशिक्षण;

महाराष्ट्र टाईम्समधील दि.१६ रोजीची इंटरनेटवरील बातमी

‘डेटवर गेल्यानंतर आपल्या आईला फोन करू नका, जेव्हा मुलीला भेटायला जाल तेव्हा फूल जरूर घेऊन जा…’ या आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण डेटिंग टिप्स जाणकारांची एक टीम पारशी मुलांना देणार आहे. मुंबईत त्यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुलींची मने कशी जिंकायची, याबाबत अविवाहित पारसी मुलांना टिप्स दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमांर्गत पारसी युवकांना आपल्याच समाजातील मुलींशी लग्न जुळवण्याबाबत प्रेरित करण्यात येणार आहे.

Linah Baliga, TNN | Updated:Sep 16, 2019, 11:21AM IST

मुंबई: ‘डेटवर गेल्यानंतर आपल्या आईला फोन करू नका, जेव्हा मुलीला भेटायला जाल तेव्हा फूल जरूर घेऊन जा…’ या आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण डेटिंग टिप्स जाणकारांची एक टीम पारशी मुलांना देणार आहे. मुंबईत त्यासाठी एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुलींची मने कशी जिंकायची, याबाबत अविवाहित पारसी मुलांना टिप्स दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमांर्गत पारसी युवकांना आपल्याच समाजातील मुलींशी लग्न जुळवण्याबाबत प्रेरित करण्यात येणार आहे. 

या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ‘जाम-ए-जमशेद’ नावाचे पारशी वृत्तपत्र आणि ‘जियो पारशी’ फाउंडेशन करत आहेत. २२ सप्टेंबर या दिवशी मुंबईतील आरटीआय हॉलमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमात जाणकारांची एक टीम १८ ते ४५ वयोगटातील अविवाहित पारशी युवकांना विवाहासाठी तयार करण्याचे काम करणार आहे. 

‘आईच्या पदराला बांधलेले असतात पारशी तरुण’

पारशी तरुण आपल्या आईचे खूपच लाडके असतात. मात्र आईच्या पदराला अशा प्रकारे बांधलेले राहणे योग्य नाही, असा सल्ला आपण पारशी तरुणांना देणार असल्याचे पॅनलचे सदस्य डॉ. अशदिन टर्नर यांनी सांगितले. डॉ. टर्नर या पारशी तरुणांना महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. पारसी तरुण पारसी तरुणीसोबत डेटवर गेल्यानंतर त्याने तिथून आईला फोन करू नये अन्यथा त्याची डेट पाण्यात जाईल. तसेच मुलीला भेटण्यासाठी जाताना या तरुणाने फूल जरूर घेऊन जावे आणि या फुलाची निवड आपल्या आईने केली आहे हे मात्र मुलीला कधीही सांगू नये, अशा काही टिप्स आपण पारशी तरुणांना देणार असल्याचे डॉ. टर्नर म्हणाले. 

पारशी तरुणींनी समाजाबाहेर लग्न करण्याचा निर्णय घेण्याअगोदर पारशी तरुणांनी या मुलींचे मन जिंकले पाहिजे, यावरही डॉ. टर्नर यांनी जोर दिला आहे. 

फिटनेसही महत्त्वाचा

या कार्यक्रमाबाबत बोलताना फिटनेस एक्स्पर्ट शहजाद डावर यांनी फिटनेसचे महत्वा सांगितले. आपण फिट असलो तर दुसरे आपल्याकडे आकर्षित होत असतात. फिट राहण्यासाठी पारशी तरुणांनी काय खावे, काय प्यावे याबाबत डावर या तरुणांना टिप्स देणार आहेत. 

न संकोच करता मनातले कसे सांगावे?

पारशी समाजातील बहुसंख्य तरुण मुलींशी बोलायला लाजतात. मात्र, मुलींशी आत्मविश्वासाने आणि न अडखळता कसे बोलावे याबाबत होरमज रागिना हे प्रसिद्ध जॅम मास्टर मार्गदर्शन करणार आहेत. जॅमचा अर्थ आहे जस्ट अ मिनट. अर्थात एका मिनिटाच्या आत न थांबता, न संकोच करता, न अडखळता बोलण्याची कला. पारशी तरुणांनी एखादी भाषा, वाद्य अशा एका वर्षात तीन नव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. यामुळे पारशी तरुणांना वेगळी माहिती मिळेल, त्यांचा समज वाढेल. यामुळे त्यांच्याबाबत आकर्षण निर्माण होईल, असे होमरज रागिना यांचे म्हणणे आहे. 

‘जियो पारशी’ सरकारी योजना 

‘जियो पारशी’ ही एक सरकारी योजना आहे. कमी होत चाललेल्या पारशी समाजाची लोकसंख्या वाढवण्यासाठी काम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. सम १९४१ मध्ये पारशी समाजाची लोकसंख्या होती १. १४ लाख. मात्र हीच लोकसंख्या सन २०११ मध्ये ५७ हजार २६४ वर आल्याचे स्पष्ट झाले. सन २०२१ मध्ये भारताची लोकसंख्या १२० कोटीपर्यंत पोहोचत असताना पारशी समाजाची लोकसंख्या मात्र ५८ हजाराचाच आकडा गाठणार आहे. 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.