मनकवडा घन:

नेहमीप्रमाणेच मनाला भावून टाकणारा लेख

Sahajach's Blog


✍🏻 तन्वी अमित
कतरा कतरा जिंदगी-१०
दैनिक पुण्यनगरी, २९.०६.२०१९

भरून आलेला पाऊस. दिवस आणि संध्याकाळची हातमिळवणी. घराच्या गॅलरीत बसलेय मी, किती केव्हाची. वेळाची गणितं मिटून जावीत अशी वेळ. हवंनकोसं वाटवणारी, हुरहुरती वेळ. हल्ली ही अशीच तर असते मी, आत्ताच्या ह्या वेळेसारखी. सीमारेषेवर… ठामपणे हवंही नाही आणि नकोही नाही. काय हवं ह्याचा उमज नाही आणि काय नको त्याची स्पष्टता नाही.

संदिग्ध, धुसर वाट. पण मी चाललेय हिच्यावर किंवा वाट चालतीये. ही वाट कुठे जातेय त्याची कल्पना नसली तरी ती वाट माझी आहे हे नक्की.

भुरूभुरू पाऊस येतोय. थोडासा पाऊस तुषारांच्या चिमुकल्या हातांनी मला स्पर्श करतोय. जरा पुढे नेला हात तर तो ओंजळभर दान देईलही. मी काही हात पुढे करत नाहीये. गाठो हा पाऊस गाठेल तेव्हढा. समोरचं मोगऱ्याचं झाड कडिपत्त्याकडे झुकलंय. आता ह्याने त्याचा गंध उधार घ्यावा की त्याने ह्याचा उसना… ठरवो त्यांचे ते बापडे. मरव्याचं रोप तरी बाजूला सरकवायला हवं असं अस्पष्ट वाटून जातंय फक्त. हलका गारवा घेऊन मिरवणारा वारा सुटलाय…

View original post 462 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.