भटकंती फिरोजशहा कोटल्याची

जुन्या दिल्लीची मनोरंजनक माहीती. विशेषत: अशोकस्तंभाबाबतची माहिती अनेकांना आवडेल.

Chinmaye

फिरोजशाह कोटला म्हंटलं की बहुतेक लोकांना आठवतं क्रिकेटचं मैदान! अनिल कुंबळेनी दहा विकेट टिपण्याचा पराक्रम ज्या मैदानात केला तेच! त्या मैदानाच्या अगदी बाजूलाच एक ऐतिहासिक स्थळ आहे. ते म्हणजे फिरोजशाह कोटला नावाचा किल्ला. खरंतर मैदानाला नाव मिळण्याचं कारण हा किल्ला आहे. पण सामान्य लोकांच्या दृष्टीने हे समीकरण थोडंसं उलटं आहे. २०१६ च्या आयपीएल मध्ये क्रिकेट प्रोड्युसर म्हणून मी काही सामने या मैदानात केले होते. तेव्हाच या किल्ल्याचे बुरुज दिसले होते. मग नंतर निवांत फोटो काढायला गेलो तेव्हाही रिक्षावाल्याने कोटला म्हंटल्याबरोबर स्टेडियम का अशी पृच्छा केली. तर आज तुम्हाला सांगणार आहे फिरोजशाह तुघलक या सुलतानाने बांधलेल्या फिरोजाबाद शहराची कहाणी. हे दिल्लीचं पाचवं शहर.

दगडी बांधकाम असलेल्या भिंती

फिरोजशहाला बांधकामे करण्याचा छंद तर होताच शिवाय जुनी बांधकामे जतन करण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याचं महत्त्वही त्याला पटलेलं होतं. कुत्ब मिनार, हौज खास, अल्लाउद्दीन खिलजी आणि शमसुद्दीन इल्तमश च्या कबरी या बांधकामांची डागडुजी त्याने केल्याच्या नोंदी आहेत. भारतातील सर्वात जुना मकबरा म्हणजे महिपालपूरचा सुलतान गढीचा…

View original post 592 more words

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.