आणखी एक जुने पुस्तक – मुंबईची माहिती देणारे, जुन्या काळातील मुंबईची माहिती देणारे
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. शाळेत असताना अनेक वेळा कानवर पडलेल्या या पंक्ती. देशाटन केल्याने खरोखरच आपण जास्त ‘सोशल’ (सोशल मीडिया सॅव्ही नव्हे हं !) व्हायला लागतो.
एखाद्या नवीन गावाला आपल्याला भेट द्यायची असल्यास आपण काय करतो? प्रथमत: त्या गावाला पोहोचण्यासाठी वाहतुकीची कुठली साधने उपलब्ध आहेत हे आपण तपासतो. मग त्या गावात राहाण्यायोग्य हॉटेल कुठले आहे, गावात फिरण्यासाठी काय वाहतुक व्यवस्था आहे, जेवणासाठी कुठले पर्याय उपलब्ध आहेत, गावात बघण्यासाठी कुठली प्रेक्षणीय स्थळे आहेत इ. गोष्टींची आपण माहिती काढतो. आजच्या काळात इंटरनेटमुळे हे काम अतिशय सोपे झालेले आहे. काही सेकंदात ही माहिती तुमच्यासमोर येते.
पण सुमारे ९०-१०० वर्षांपूर्वी या माहितीसाठी कुठली साधन उपलब्ध होती हे बघायला गेले तर आपल्याला असे आढळते की ही माहिती त्या काळात मिळणे तसे कठीणच होते. एखाद्या नवीन गावी जायचे असल्यास तेथे कोणी आप्त/ओळखीचा राहतो का याचा पहिल्यांदा शोध घेतला जात असे. (म्हणजे आऊचा काऊ तो माझा भाऊ असं काहीतरी नातं शोधून काढलं जाई) असा कोणी…
View original post 1,537 more words