“व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले” ही उक्ती ब्रिटींशाच्या बाबतीत नेहमीच वापरली जाते. पण राज्यकर्ते बनतानाचा त्यांचा प्रवासही तेवढाच मनोरंजक आहे. शतकभराच्या प्रवासाच्या त्यांच्या या आठवणी त्यांनी अनेक ठिकाणी लिहून तर काढल्या आहेतच पण जतनही केल्या आहेत. ब्रिटिश राज्यकर्ते म्हणून उदयाला आल्यानंतरही त्यांचे भारताविषयीचे आकर्षण संपलेले नव्हते. त्यांनी भारतीय, त्यांची संस्कृती, धर्म इ. विषयी विस्तृत अभ्यास केला. भारतभर प्रवास करताना त्यांनी प्रवासवर्णनेही लिहिली. यातले अनेक लेखक मुलकी किंवा सेनेतले अधिकारी आहेत. त्यामुळे यातल्या अनेकांच्या आठवणी आपल्याला एकसारख्याही वाटतात. या सगळ्यातून एक प्रवासवर्णन किंवा आठवणी सांगणारे लिखाण मात्र वेगळं आहे कारण ते लिखाण एका स्त्रीचे तिच्या भारतातल्या वास्तव्याच्या स्मृती जागवणारं आहे.
ही स्त्री आहे १८४८ ते १८५३ मध्ये मुंबईचा गव्हर्नर असणाऱ्या ल्युशिअस बेंटिक कॅरे उर्फ लॉर्ड फॉकलंडची पत्नी अॅमेलिया कॅरे. तिच्या या पुस्तकाचं नाव ‘Chow-Chow; Being selections from a journal kept in India, Egypt and Syria’ हे इतकं लांबलचक आहे. हे पुस्तक १८५७ साली लंडनमध्ये प्रकाशित झाले. पुस्तक प्रकाशनाच्यावेळी या बाईसाहेब जिवंत…
View original post 2,473 more words