भारतीयांना न गवसलेले एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे गांधी. त्यांच्यावरील हा एक वस्तुस्थितीदर्शक लेख
महात्मा गांधी एक विश्वव्यापी व्यक्तिमत. मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला ह्यांना ते भावले. २००० साली ‘मिलेनियम’ वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमधे लेखक, नेते, शास्त्रज्ञ,कलावंत यांना मागे टाकत आईन्स्टाईन आणि गांधीजी ही दोन नावं उरली. त्यात आईन्स्टाईन ला जास्त मत पडली. तोच आईन्स्टाईन एकदा म्हटला होता, ” गांधींसारखी व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि ह्या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढीला पटणार नाही.” भारतामध्ये तर ‘गांधीझम’ चे अभ्यासक आणि गांधीवादी अनेक विचारक आहेत. ज्यांच्या विचाराने भारावून जावे असे हे व्यक्तिमत्व. मला गांधींमधील सर्वात भावणारा गुण म्हणजे त्यांचा कमालीचा साधेपणा. तो त्यांच्या पेहरावापेक्षा वागण्या बोलण्यात जास्त होता.
गांधी सिनेमात एक दुश्य आहे. नेहरू,पटेल व इतर नेते आदी मंडळींची महत्वाच्या विषयावर गांधीजी सोबत मिटिंग चालू असते. गांधीजी एकदम उठतात. सगळे आश्चर्याने पाहू लागतात. गांधीजी म्हणतात , “माझ्या बकरीकडे बघायची वेळ झाली ” सगळ्यांच्या चेहऱ्यावर वैताग, काय हे खुळं असा भाव. मला हा प्रसंग फार ठसला. देशाचा कारभार करणं हा जसा जीवनाचा भाग आहे …
View original post 429 more words