पधारो राजस्थान

माऊंट आबू

या खडकाने डायनासोरचा आकार धारण केला आहे.  आणि मी त्याच्या डोक्यावर बसलो आहे. 

राजस्थानच्या आमच्या सफरीचा पहिला पडाव होता तो माऊंट आबु. एक लोकप्रिय हिलस्टेशन म्हणून माऊंट आबूचे नाव सर्वांना परिचित आहे. प्रत्यक्ष माऊंट आबूत फिरताना महाराष्ट्रातून आलेल्या मला अनेकदा महाबळेश्वरचा फिल येत होता. विशेषत:तिथले मार्केट,घरांची रचना,तळ्याकाठचा परिसर, पार्किंगची व्यवस्था. पण मला माऊंट आबूत लक्षात राहिले ते तिथले खडक. वेगवेगळ्या रंगांचे आणि वेगवेगळ्याआकारांचे. माझ्याबरोबर माझी भुगोलाची प्राध्यापिका असलेली बहीण होती. तिने दिलेल्या माहितीनूसार माऊंटआबू हा जगातील सर्वात जूना पर्वत आहे. त्यामुळे त्याची खुप झीज झालेली आहे.तिथला दगडही वाळूकाश्म प्रकारातला आहे.त्यामुळे तो लवकर झिजतो. त्याचा परिणाम म्हणून हे दगड वेगवेगळे आकार धारण करतात.

गुरुशिखरच्या वाटेवरचा एक भलामोठा दगड डायनासोरचा आकार धरून बसलेला होता. प्रत्यक्ष गुरुशिखर म्हणजेही दगड झिजून तयार झालेली छोटीसी गुहा आहे.त्यावर भगवा रंग लावलेला आहे. त्याच्या आसपासची अनेक मंदिरेही अशीच दगडांचा आधार घेऊन उभी आहेत.

हा एक वेगळाच आकार
गुरुशिखर म्हणजे म्हणजे एक खडक आणि त्यातली नैसर्गिक गुहा, त्याला भगवा रंग देऊन त्यांचे मंदिर तयार केलेले आहे. 
खडकातील नैसर्गिक गुहा कि जबडा उघडून बसलेला कोणी प्राणी ?
खडकात  तयार  झालेली छोटीसी पोकळी
आता ही माणसाची कवटी म्हणायची का काय म्हणायचे ? 

यातलाच आणखी एक वैशिष्ठपूर्ण खडक म्हणजे नक्की तलावाच्या बाजूचा टॉड रॉक. तळ्यात उडी मारण्यासाठी तयार असलेल्या बेडकाचा आकार धारण केलेला भलामोठा खडक. त्याच्याबाजूला असलेला गुळगळीत गोट्याचा आकाराची भल्यामोठ्या खडकाची टेकडी. वेगवेगळ्यारंगाच्या छटा असलेले,तळहातावर मावणाऱ्या दगडांपासून नजरेतही न मावणारे प्रंचड आकार.यात दोन खडकांतील भेग सांधणारी पांढऱ्या रंगाच्या संगमरवराची झ़लक, तांब्यांचा अंश दाखवणारे तांबड्या रंगाचे खडक, काही ठिकाणी हिरवट रंग अशा अनेक तऱ्हेच्या खडकांची अजब दुनियाम्हणजे माऊंट आबू.

तळ्याजवळच्या टेकडीवरील हा टॉड रॉक समोरच्या बाजूने 

पुर्वीपासून आजपर्यंत माणसांनी याचा भरपूर वापर करून घेतलेला आहे. त्यामुळे सगळीकडे संगमरवराचा मनसोक्त वापर. देवळे,घरे, महाल,हॉटेल सगळीकडे संगमरवर भरपूर पहायला मिळतो. तो देखील एकखडकच.

टॉड रॉक त्याच्या डाब्या बाजूने,  हा एकाबाजूने तळ्यात  उडी मारण्यासाठी तयार बेडूक वाटतो. थोडे लांबून पाहिले तर कावसाचा आकार धारण करतो. 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.