बलात्कार

 

संजय सोनवणी

Posted: 24 Apr 2018 08:08 PM PDT

Image result for rape

जागतीक बलात्कारांचा इतिहास (A natural History of Rape) या क्रेग पामर लिखित ग्रंथात बलात्कारांची ऐतिहासिकता व त्याचे वर्तमान संदर्भातील घटनांचे समाजशास्त्रीय अंगाने विश्लेशन केले आहे. समाजातील धार्मिक व सामाजिक नीतिमुल्यांचा आणि बलात्कारांचा अन्वयार्थ त्यात काही प्रकरणांत लावण्यात आला आहे.

भारतीय परिप्रेक्षात पाहिले तर बलात्कारांचा इतिहास मानवी संस्कृती इतकाच पुरातन आहे, परंतू त्याला “बलात्कार” समजले जात नसे एवढेच!
बलात्कार, हत्या आणि काही प्रकारच्या आत्महत्या या एकाच मानसिकतेच्या विक्षोभाची तीन प्रकट रुपे आहेत. आणि हे प्रकटीकरण त्या त्या वेळची मानसिकता ठरवते. त्यांना प्रासंगिक संदर्भ कोणतेही असु शकतात.
दुर्बलांना चिरडने किंवा स्वपीडनही …… सार्वत्रिक मानसिकता. ती आर्थिक, राजकीय, जातीय/धार्मिक वर्चस्वाच्या भावनांतुन जशी येते तशीच पुरुषीपणाच्या रासवट भावनांतुनही येते. आणि हाच रासवटपणा स्त्रीयांतही अस्तित्वात नसतो असेही नाही.
त्या त्या परिप्रेक्षात बलात्कार होतच असतात, पण मानसिक अथवा शोषक बलात्कार कायद्यांच्या परिभाषेत येत नाहीत.
बलात्काराची अभिव्यक्ती ही बलात्का-याला संधी मिळण्यावर अवलंबून असते. मग ती कोणतीही असो. कशीही येवो. अथवा नकळत दिली जावो…मिळवली जावो. पण बलात्कारी समाजातुनच जन्माला येत असल्याने समाजाला केवळ त्याविरुद्ध कठोर कायदे बनवून पापमुक्त होता येत नाही. किंवा बलात्कार थांबण्याची ग्वाहीही त्यातुन देता येत नाही.
कारण बलात्कारी पैदा होतो हे समाजाचेच अपयश असते. पण समाज तसे कधी मानत नाही ही एक समाजविकृती असते.
आमचे आर्थिक स्तर वाढले असतील, आमचे वाचन, श्रवण माध्यमस्फोटांमुळे अधिक वाढले असेल पण आमचा मानसिक दर्जा उंचावलेला नाही. किंबहुना तो उंचवावा अशी यंत्रणा आम्ही निर्माण केलेली नाही हे आमच्या आधुनिक समाजाचे अपयश आहे.
वैचारिक विश्वातही हिंस्त्र झालेले आम्ही संधी मिळाली तर केवळ वैचारिकच नव्हे तर कोणत्याही प्रकारचा बलात्कार करणार नाही याची ग्वाही देवू शकत नाही.
आमचे आजचे बलात्कारी आमच्याच सुप्त मानसिकतेचे दृष्य रुप आहेत. त्यांना शिव्या घालतांना स्वत:लाही तेवढ्याच शिव्या घालायची आमची हिंमत आहे काय?

 

1 thought on “बलात्कार”

 1. Yes you are cent% true & your way of expression is also fabulous. You have written this post in marathi language. I have written a post on same matter. Please check & follow. Also give your opinion.

  जिन्स पहनने से रेप हुआ
  अब हिजाब वालों को भी नहीं छोड़ा
  रात को बाहर जाने से रेप हुआ
  अब तो घर के अंदर वालों को भी नहीं छोड़ा

  https://wp.me/p8hgnL-2V

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.