भगवान बुद्धाची ज्ञानयात्रा सुरु झाली ते ठिकाण आज आपण पाहणार आहोत. सारनाथ हे हजारो वर्षे जुन्या संस्कृतीच्या केंद्राजवळ म्हणजे वाराणसीजवळ वसलेलं एक गाव. बुद्धासारख्या महात्म्याने धम्माची दीक्षा द्यायला हे ठिकाण निवडले आणि इतिहासाच्या नकाशावर सारनाथला अढळपद मिळाले. ही भूमी संत-महंतांचीच असावी कारण जैन धर्माचे अकरावे तीर्थांकर श्रेयांसनाथही जवळच्या सिंघपूरचे. गौतम बुद्धाने या जागेला इसीपट्टण म्हणून […]
