सखे आणि सोबती -आनंदराव भोसले

शरद पवारांचे कार्यकर्ते असलेले कै. आनंदराव भोसले. पवारसाहेब आणि आनंदराव यांचे जिव्हाळ्याचे नाते पाहिले की नक्की वाटतं, कार्यकर्ता असा पाहिजे आणि नेता तर असाच पाहिजे

 

आनंदरावांसाठी त्यांच आणि पवारसाहेबांचं नात हे कार्यकर्ता व नेता असं नव्हतं तर देव व भक्ताच होते. आनंदरावांनी फुलविलेल्या फळबागेतील फळाची पहिली पेटी साहेबांसाठी जात असे. त्यांच्या ग्रीनहाऊसमधील फुलांची पहिली भेट साहेंबाना दिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. पवारसाहेबांवर एका व्यक्तीने हल्ला केला अशी बातमी आली त्यावेळी आनंदराव आजारी होते. त्यावेळी दिवसभर सगळ्यांनी आग्रह करूनही अन्नाचा एकही घास त्यांच्या घशाखाली उतरला नाही. कोणत्याही कामात असले तरी मनात विचार चाले तो साहेबांचा. देशभरातील साहेबांच्या सभेसाठी कसेही करून जात. डेहराडुनला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिवेशन होते. त्यावेळी घरात लग्न निघाले होते. पण त्यातूनचही वेळ काढून डेहराडूनला गेलेच. साहेबांनी जळगाव ते नागपुर पायी दिंडी काढली, तिथे गेले. नागपुरला साहेबांना अटक करून दुसऱ्या ठिकाणी ठेवले होते. नागपुरसारख्या अनोळखी शहरात पत्ता हुडकत हुडकत जिथे साहेब होते तिथे गेले आणि त्यांच्याबरोबर राहिले. यामध्ये निर्भेळ प्रेमाखेरीज काही नव्हते. ना कधी कोणत्या पदासाठी आग्रह धरला, ना कधी व्यक्तिगत काम सांगितले.  फक्त प्रेम दिले आणि प्रेम घेतले.

आनंदराव आजारी असताना त्यांचा मुलगा दिवाळीनिमित्त साहेबांना भेटायला गेला होता. बोलता बोलता साहेबांनी आनंदरावांची चौकशी केली. ते आजारी आहेत हे कळल्यावर पुढच्या दोन तासात साहेब वाणेवाडीत घरी हजर झाले. साहेबांना पाहून बिछान्यावर पडलेल्या आनंदरावदादांच्या चेहऱ्यावर तरतरी आली. साहेबांशी झालेल्या गप्पानंतर त्या आधारावरच त्यांनी आपल्या आयुष्यातील अखेरचे चारपाच महिने काढले.

वाणेवाडीतील भोसले हे मातब्बर घर. कोणत्याही प्रसंगाला थेट सामोरे जाण्याची त्यांची क्षमता पंचक्रोशीत सगळेजण जाणून होते. सोमेश्वर साखर कारखान्याच्या संघर्षात या घराने सतत शरद पवारांना साथ दिली. त्यांनी कारखान्यासाठी जे नेतृत्व दिले ते विनातक्रार मान्य केले. कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे कोणत्याही क्षणी संघर्ष होण्याचे ठिकाण. येथेही भोसल्यांच्या घरातील माणसं सर्व तयारीनिशी शरद पवारांच्या विचारामागे उभी असत. आनंदरावांना आपले हे सामर्थ्य चांगलेच माहिती होते. त्यामुळे स्वभाव आक्रमक नसला तरी भीती हा शब्द त्यांना माहिती नव्हता. कारखान्याच्या निवडणूकीत सत्ताधारी गटाचे उमेदवार व तत्कालिन कारखान्याचे चेअरमन समोर उभे असताना त्यांच्यासमोर जाऊन पवार गटाचे पोस्टर, बॅनर लावण्याची धमक त्यांच्यामध्ये होती.

मात्र हे सगळं करायच ते शरद पवारांसाठी.

मुंबईत जॉर्ड फर्नांडिस यांनी रेल्वेचा संप घडवून आणला. त्यावेळी पवारसाहेबांचा आनंदरावांना फोन आला, हा संप मोडून काढायचा आहे, त्यासाठी आपल्या गावाकडची मुल घेऊन मुंबईला या. आनंदरावांनी आसपासची मुल गोळा केली. मजुरी काम करणारी, गरीबाची मुले घेतली. एक मुलगा तर बागेत काम करत होता. त्याच्या डोक्यावरती पाटी खाली टाकून आहे त्या कपड्यावर त्याला ट्रकमध्ये टाकला. अशी 50 हून जास्त तरुण घेऊन मुंबईला गेले. मुंबईत शिरणही त्यावेळी अवघड होते, त्यावेळी अनेक खटपटी करून या सगळ्यांना मांटुंगा येथील वर्कशॉपमध्ये पोचवले. तिथे त्यांना कामाला लावले. राहण्याची व जेवणाची काहीच व्यवस्था नाही. या स्थितीत आठवडाभर तिथे राहिले. या मुलांना बाहेरून वडापाव किंवा जे मिळेल ते आणून त्यांची जेवणाची व्यवस्था केली. काही दिवसांनी वातावरण निवळले. त्यानंतरही या मुलांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करून आनंदराव पुन्हा वाणेवाडीला आले. या सगळी मुल आज रेल्वेत कायम सेवेत चांगल्या पगारावर काम करत आहेत.

आनंदरावांना आधुनिक शेतीची मोठी आवड. प्रत्यक्ष शेतात काम केले नाही तरी नवनवीन प्रयोग करून पाहणे ही आवडीची गोष्ट. या आवडीतून परिसरात पहिल्यांदाच इंडम कंपनीचे हायब्रीड टोमँटो केले. दापोलीहून चिकूची रोपे आणली, नागपूरहून संत्र्याची रोपे आणली. ग्रीनहाऊसमध्ये फुलशेती केली.

या फुलशेतीच्या प्रयोगावेळी कोईमतूरच्या एका संस्थेची मदत घेतली होती. त्याच सुमारात पवारसाहेब या संस्थेत पाहणीसाठी गेले होते. तिथे चर्चा करताना आनंदरावांनी येथून रोपे नेली आहेत ही माहिती त्यांना कळली. नियोजित भेटीनंतर त्यांनी संस्थेच्या मॅनेजरला बोलावून घेतले. पुन्हा सखोल चौकशी केली. आमच्या माणसाने येथून रोपे नेली आहेत. तो प्रकल्प खरच फायदेशीर आहे का. त्यांना नक्की फायदा होईल याबद्दल खोदून खोदून प्रश्न विचारले. पुर्ण समाधान झाल्यावरच साहेब तिथून गेले. राजकारण्यांबद्ल मनात अढी असलेला पाटील नावाचा हा मॅनेजर यानंतर पवारसाहेबांचा कट्टर भक्त झाला.

एकदा साहेबांची भेट झाली त्यावेळी आनंदराव, त्यांचे बंधू व मुलगा बरोबर होता. कर्जमाफी करावी की नाही याबाबत त्यावेळेस चर्चा सुरू होती. साहेबांनी ग्रीनहाऊसचे काम पहात असणाऱ्या आनंदरावांच्या मुलाला फुलशेतीबाबत माहिती विचारली. आनंदरावांना साखर कारखान्याबाबतची माहिती विचारली तर दुधसंघावर काम करणाऱ्या त्यांच्या बंधुना दुधधंद्याबाबत माहिती विचारली. हे तीनही व्यवसाय तोट्यात चालू आहेत हे लक्षात आल्यानंतर कर्जमाफीबद्दल मत विचारले. समोरच्या माणसांकडून माहिती काढुन घेण्याचे साहेबांचे हे कौशल्य होते.

आणखी एक प्रसंग साहेबांच्या नियोजनकौशल्य आणि सर्वव्यापी संपर्काची ओळख करून देणारा. आनंदराव त्यांच्या काही मित्रांना घेऊन वैष्णोदेवीला गेले. वैष्णोदेवी येथेच त्यांच्या एका सहकाऱ्याला मृत्यू आला. तेथील स्थानिकांनी सांगितले की येथून मृतदेह परत नेणे अशक्य आहे. येथेच सर्व संस्कार करा. आनंदराव म्हणाले, या माणसाला मी घेऊन आलो आहे. त्याचा मृतदेह त्याच्या घरच्या पर्यंत पोहचविणे ही माझी जबाबदारी आहे. त्यांनी त्यांच्या देवाला साकडे घातले.  पवारसाहेबांना फोन केला आणि सर्व व्यवस्था झाली. मृतदेह एका पेटीत घालून जम्मु स्टेशनपर्यंत नेण्यात आला. तेथे 50 हुन जास्त कार्यकर्ते त्यांना शोधत आले. त्यांनी आणलेले हार त्या पेटीवर घालुन श्रद्धांजली वाहिली. मृतदेह रेल्वेने नेण्यास परवानगी नसते. येथे विशेष परवानगी काढण्यात आली. मृतदेह रेल्वेच्या डब्यात ठेवला. गाडी सुटेपर्यंत हे कार्यकर्ते थांबून होते. यानंतरही ज्या स्टेशनवर गाडी थांबेल त्या स्टेशनवर बर्फ घेऊन हमाल तयार असे. मृतदेह ठेवलेल्या पेटीत बर्फ टाकण्याचे काम तो करत असे. काही कार्यकर्ते येत, मृतदेह घेऊन जात असलेल्या लोकांसाठी जेवण देऊन जात असत. जम्मुपासून दौंडपर्यंत केवळ पवारसाहेबांच्या शब्दावर ही सोय झाली.

आनंदरावांकडे समन्वय साधण्याची हातोटी होती. त्यामुळे अनेक परस्परविरोधी लोकांशी त्यांचा चांगला संपर्क असे. तालुक्यात आलेल्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याशी त्यांची मैत्री होई. या मैत्रीच्या बळावर त्यांनी अनेक विकासकामे गावासाठी करून घेतली. अनेक अडचणीच्या प्रसंगांचे पुढारीपण या समन्वयाच्या बळावर त्यांच्याकडे येत असे. सोमेश्वर देवस्थानाचा जिर्णोद्धार हा लोकांच्या भावनेचा विषय होता. येथील प्रत्येक वास्तुशी लोकभावना निगडित होत्या. त्यामुळे काही नवी रचना करणे जिकिरीचे होते. यातून अजितदादा पवार आणि देवस्थान कमिटी यांच्यात समन्वय घडविण्यात आनंदरावांचा मोठा सहभाग राहिला. त्यातून आज सोमेश्वर देवस्थानचे नवे रुप दिसते आहे.

आनंदरावांनी पंचायत समितीवर काम केले. महाराष्ट्र राज्य पुष्पविकास संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार लागली. सोमेश्वर साखर कारखान्यावर संचालकपदी काम केले. त्यांची जी क्षमता होती त्यानूसार त्यांना सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमनपद मिळायला हवे होते अशी त्यांच्या समर्थकांची भावना होती. परंतू आनंदरावांनी याबाबत कधीही नाराजी दाखवली नाही. त्यांच्यासाठी त्यांचा देव सगळ्यात मोठा होता. त्याच्या प्रेमछायेत राहणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. ते त्यांनी साऱ्या आयुष्यभर जपले.

—————————————————————–

आनंदराव आजारी असल्याचे कळल्यावर तातडीने त्यांना भेटण्यासाठी आलेले पवारसाहेब व त्यांच्या पत्नी.

ss-63

8 thoughts on “सखे आणि सोबती -आनंदराव भोसले”

 1. दादांंचे साहेबांवरील निस्सीम प्रेम.
  साहेबांनी देखील ते कधी कमी पडू नाही.
  हिचतर खरी भक्ती आहे.

  Like

  1. अाभिप्रायाबाबत धन्यवाद. पवारसाहेबांचे असे असंख्य कार्यकर्ते आहेत, ज्यांना ” शरद पवार” या धाग्याने जोडलेले आहे. यातील जमेल तितक्या लोकांना भेटून त्यांचे अनुभव जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपलीही साथ आम्हाला हवी आहे.

   Like

  2. अाभिप्रायाबाबत धन्यवाद. पवारसाहेबांचे असे असंख्य कार्यकर्ते आहेत, ज्यांना ” शरद पवार” या धाग्याने जोडलेले आहे. यातील जमेल तितक्या लोकांना भेटून त्यांचे अनुभव जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपलीही साथ आम्हाला हवी आहे. याच ब्लॉगवर आपल्याला अशा अनेकांची ओळख होईल.

   Like

 2. आनंदरावदादांची जिद्द व चिकाटी वाखाणण्यासारखी होती आणि त्यांचे शरद पवारसाहेबांप्रती असणा-या निष्ठेला तोड नव्हती, त्यांनी श्री सोमेश्वर कारखान्यासाठी घेतलेल्या कष्टांचे फळ त्यांना त्यांच्या हयातीत मिळाले नाही हे जरी खरे असले तरी त्यांनी जे पेरुन ठेवले आहे ते कधीतरी उगवणारच आहे व त्याचे फळ नक्की पुढील पिढीला मिळणारच आहे याची खात्री माझ्या सारख्याच्या मनांत आहे फक्त धिर धरणे गरजेचे आहे असे मला वाटते आणि त्याचवेळी त्यांना ख-या अर्थाने श्रध्दांजली ठरेल

  Liked by 1 person

  1. दादा, अाभिप्रायाबाबत धन्यवाद. पवारसाहेबांचे असे असंख्य कार्यकर्ते आहेत, ज्यांना ” शरद पवार” या धाग्याने जोडलेले आहे. यातील जमेल तितक्या लोकांना भेटून त्यांचे अनुभव जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपलीही साथ आम्हाला हवी आहे.

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.